आसेफिया कॉलनीत ३९ नळजोडण्या खंडित

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महापालिकेने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून घाटी परिसरातील आसेफिया कॉलनीत ३९ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच रस्त्यावर पाणी वाया घालवणाऱ्या निष्काळजी नागरिकाकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त अमोल येडगे हे शहरात पाहणी दौऱ्यावर असताना रस्त्यावर स्वच्छ पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. यानंतर आसेफिया कॉलनी परिसरात विशेष मोहीम राबवली. येथील २५० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून थेट रस्त्यावर गळती करणाऱ्या तब्बल ३९ अनधिकृत नळजोडण्या पथकाने तत्काळ खंडित केल्या.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions